Project Description
ग्रामंती
अर्थात ग्राम भटकंती !
भारताची विविधता समजुन घेताना त्यातील ६००हुन अधिक जिल्हे , ६५००हुन अधिक तालुक्याची ठीकाणे आणि तितकीच इतर शहरे यांत डोकाउन पहायला सगळेच उत्सुक दिसतात.परंतु या भारताचा गाभा समजुन घ्यायचा असेल तर मात्र ग्राम भटकंतीला पर्याय नाही .हिरवा निसर्ग – डोंगर रांगा – नद्या -तलाव – डोलणारी शेते – चरणारी गायी – गुरे – मेंढरे – इटुकल्या वाड्या वस्त्या – चिटुकली गावे
यामधे राहुन उपजीविका चालवणारा आपणा सर्वांचा अन्नदाता शेतकरी नानाविध आव्हानानां तोंड देत शेतात रमणारा , जमेल तसे जोड उद्याेग करुन आपले कुटुंब चालवणारा हा गावकरी समजुन घेण्यासाठी त्याच्या सानिध्यात किमान एक दिवस तरी द्यावा म्हणजे जीवनाकडे समाधानाने पहाण्याचा दृष्टीकोन मिळणार यात शंका नको . गावाकडे वळु पहाणार्या या सहलीनां कुणी कृषि पर्यटन तर कुणी ग्राम पर्यटन म्हणतात .आपण याला ग्रामंती म्हणतो .
यामधे स्थानिक साधन सामग्रीतुनच साकारलेले नाविण्य आपण पाहणार आहोत .ग्रामीण भागातील शेतीचे काही प्रशंसनीय प्रयोग , जोड उद्योग जसे देशी गायीचे गोपालन , मध माशीचे मधु पालन , गांडुळ खत समजुन घेणार आहोतकरवंद व फणस यांच्यावर प्रक्रीया करुन बनविलेले खाद्य पदार्थ आणि शेतकर्या घरची न्याहरी व जेवण चाखणार आहोत.बांबु व लाकडापासुन बनणारी खेळणी , गृहोपयोगी वस्तु येथे बनवायला असलेली संधी आपल्याला खुणवेल .या सर्वात दडलेली अर्थारजनाची संधी व क्षमता जाणुन घेणार आहोत
कोल्हापुर जिल्हयातील प्रत्येक गावा गावात ही ग्रामंतीरुपी अर्थारजनाची गंगा खळखळण्याला अगाध वाव आहे.याला सकारात्मक दृष्टीने उद्याोग म्हणुन पाहील्यास खुप सारे रोजगार यात दडलेले दिसतात , जे नक्कीच आजच्या भेडसावणार्या बेरोजगारीवर उत्तम उतारा ठरु शकतात.हे सर्व प्रयोग वास्तवात पाहायला गगनबावडा तालुक्यातील घरपण , मार्गेवाडी , शेनवडे या गावना भेट देउन तेथिल शेतकरी बंधु भगीनींनकडुन आपण सविस्तर माहीती समजुन घेउया .आणि हो या सर्वांच्या जोडीला पळसंब्याची लेणी , मोरजाई पठार या प्रेक्षणीय स्थळानांपण भेटुया .
एक दिवसीय अभ्यास भेट
मार्ग : कोल्हापुर कळे घरपण मार्गेवाडी शेनवडे पळसंबे मोरजाई पठार कोल्हापुर
कोल्हापुर सुरुवात : सकाळी ७.३०
घरपण येथिल देशी गो पालन करणारे नामदेव मोळे यांची गप्पा भेट ९.०० ते १०.००
मार्गेवाडी येथिल मोहन पडवळ यांचेकडुन फणस प्रक्रीया व विक्रीची माहीती घेवुया १०.३० ते ११.००
गावाच्या आसपास वनराजी अबाधीत राहावी म्हणुन देवराईची संकल्पना रुजली. घनदाट सावलीची अशीच एक देवराई पाहुया खोकुर्ले गावात.
११.३० ते १२.००
अंदाजे १५०० वर्ष तरुण पळयंब्याच्या लेण्याला भेट १२.३० ते १.१५
शेननडे येथिल बापु जाधव यांचेकडुन करवंद प्रक्रीया व विक्रीची माहीती घेवुया १.४५ ते २.१५
दुपारचे भोजन येथे २.३० ते ३.३०
गगनगड भेट –
४.०० ते ५.३०
परतीचा प्रवास सायं ६.०० ला सुरुवात
कोल्हापुर आगमन सायं ७.३०
सदर भेटीला येताना
टोपी पाणी बाटलीबुट छत्री नोंद वही घेऊन येणे
* नाश्टा व दुपारचे भोजन*
शेतकर्याच्या घरी बनविलेले
शाकाहारी पद्धतीचे असेल