Project Description

राधानगरी अभयारण्याचा समावेश जागतिक वारसास्थळांमध्ये करण्यात आला आहे. जगातील ३४ अतिसंवेदनशील ठिकाणांपैकी पश्चिम घाटात राधानगरी अभयारण्य येते. दक्षिण व उत्तरेकडील पश्चिम घाटाला जोडणारा हा सह्याद्रीमधील महत्वाचा जंगलपट्टा आहे. निमसदाहरीत जंगल प्रकारात याचा समावेश होतो. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेस असणार्या राधानगरी अभयारण्याचा परिसर ३५१ चौ. कि. मी. आहे. समुद्रसपाटीपासूनची याची सरासरी उंची ९०० ते १००० फूट असून येथे सरसरी पर्जन्यमान ४०० ते ५०० मी. मी. आहे.

दाजीपूरचे जंगल हे राधानगरी अभयारण्याचाच एक भाग आहे. पूर्वी हे शिकारीकरीता राखीव जंगल होते.  कोल्हापूर संस्थानाचे महाराष्ट्र राज्यात विलीनीकरण झाल्यावर सन १९५८ ला दाजीपूर जंगलाची दाजीपूर गवा अभयारण्य आहे. राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या भोवतालच्या जंगल परिसराला मिळून सन १९८५ ला राधानगरी अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. येथील घनदट जंगलाचे पट्टे ड्म्ग याअ नावाने ओळ्खले जातात. येथील डोंगरमाथ्यांव्र जांभा खडकाचे मोठे सडे आहेत. सड्यांवर व सड्यांच्या भोवतली असणार्या दाट जंगलामध्ये एक संपन्न जैवविविधता आढळून येते.

प्रेक्षणीय स्थळे

लक्ष्मीसागर जलाशय, शाहूसागर जलाशय,सावराई सडा,सांबरकोंड,कोकण दर्शन पॉईंट,वाघाचे पाणी,सापळा,उगवाई मंदिर,शिवगड किल्ला.

राधानगरी अभयारण्याचे महत्त्व म्हणजे निमसदाहरीत व पानगळीच्या मिश्र जंगल, विस्तीर्ण सडे व गवताळ कुरणात असंख्य प्रजातींचे वृक्ष, वेली, झुडपे, ऑर्किड्स, नेचे, बुरशी आढळतात.अभयारण्यात १५०० पेक्षा जास्त फुलझाडांच्या प्रजती येथील भागात आहेत. ३०० पेक्षा जास्त औषधी वनस्पतींचे हे भांडार आहे. करवंद, कारवी, निरगुडी, अडुळसा, तोरण, शिकेकाई, रानमिरी, मुरूड शेंग, वाघाटी, सर्पगंधा, धायटी इ. झुड्पे व वेली मोठ्या प्रमाणात आहेत.

राधानगरी अभयारण्यात आजमितीस ३६ प्रकारच्या वन्यप्राण्यांची नोंद झालेली आहे.यापैकी संकटग्रस्त प्रजातींमध्ये वाघ, बिबळ्या तर फक्त पश्चिम घाटात आढळणारे लहान हरीण गेळा (पिसोरी) यांचा समावेश आहे.तसेच रानकुत्रा,अस्वल,गवा, सांबार,भेकर, चौसिंगा,रानडुक्कर, साळिंदर, उदमांजर,खवलेमांजर,शेकरु, लंगूर,ससा याच बरोबर वटवाघळांच्या तीन प्रजाती आढळतात.

पक्षी निरीक्षणासाठी राधानगरी अभयारण्य अप्रतिम ठिकाण आहे.येथे आजमितीस २३५ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे.यामध्ये ग्रेट पाईड हॉर्नबील, निलगिरी वूड पीजन ,मलबार पाईड हॉर्नबील,तीन प्रकराची गिधाडे या संकटग्रस्त प्रजांतीच्या पक्ष्यांचा समावेश आहे.जगात फक्त पश्चिम घाटातच आढळणार्या पक्ष्यापैकी १० प्रजातींचे पक्षी येथे आढळतात.अभयारण्यातील सांबारकोंड,कोकण दर्शन पॉईंट,सावर्दे,काळंम्मावाडी धरण ,उगवाई देवी मंदिर ही स्थळे पक्षी निरीक्षणासाठी उत्तम ठिकाणे आहेत

१२१ प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद राधानगरी अभयारण्यात करण्यात आली आहे.सदर्न बर्डविंग हे भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू(१९० मी.मी) असून ग्रास ज्युवेल हे सर्वात लहान फुलपाखरू(१५ मी.मी) आहे.ही दोन्ही फुलपाखरे राधानगरी अभयारण्यात आढळतात.ह्जारोंच्या संख्येने एकत्र जमुन स्थलांतर करणारी ब्ल्यू टायगर,स्ट्राईप टायगर ही फुलपाखरे या ठिकाणी आक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आढळतात.

सरिसृप गटात राधानगरी अभयारण्यात वेगवेगळ्या जातींच्या पाली,सरडे, साप-सुरळी आढळतात. उभयचर प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रजातींचे बेडूक आढळतात.गांडूळासारखा दिसणारा देवगांडूळ(caecilian) यासारख्या पर्यावरणात महत्वाच्या परंतू दुर्लक्षीत अशा उभयचर प्राण्यांच्या जाती येथे आढळतात.एका नव्या पालीच्या प्रजातींची पहिली नोंद राधानगरी येथेच झाली आहे.त्या पालीचे नामकरण Cnemaspis kolhspurensis करण्यात आले आहे. राधानगरी अभयारण्यात आजमितीस ३३ प्रजातींच्या सापांची नोंद करण्यात आली आहे.ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक, एरिक्स व्हिटेकरी,प्राईड बेली शिल्डटेल या सापांची नोंद झालेली आहे.

निसर्गात जाताना आपण निसर्गाचा एक जबाबदार घटक आहोत याची जाणीव ठेवून निसर्गाचे संतुलन बिघडू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे.

  • निसर्गात शिकण्यासारखे खूप आहे,त्याचा लाभ घ्या.
  • जंगल हे प्राण्यांचे आश्रयस्थान आहे व आपण तेथील पाहूणे.तेथे मदयपाण,धुम्रपान,दंगा आदी गोष्टी करू नका.
  • निर्सगाला स्वतःचे संगीत आहे,त्याचा आस्वाद घ्या.तेथे टेप,रेडिओ व इतर वादये वाजवू नका.
  • जंगल परिसरातील पानवठयाच्या जागी जास्त वेळ घालवू नका.पाणवठा दूषित होईल अशी कोणतीही कृती करू नका.
  • वन्यप्राण्यांशी जवळीक करण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो.पक्षांची घरटी ,प्राण्यांची वस्तीस्थाने इ.चा आदर करा.
  • निर्सगात केर कचरा होइल अशा वस्तू घेउ नका.उदा.प्लॅस्टिक कॅरी बॅग, प्लॅस्टिकच्या-काचेच्या बाटल्या,चॉकलेट-वेफर्सचे रॅपर इ.
  • वन्यप्राण्यांना कॅमेर्याने टिपा बंदूकीने नको.

Website : www.radhanagari.in

Photo Courtesy : Raman Kulkarni,Varad Giri, Harish Kulkarni,M.D.Madhusudan.

Information Courtesy : राधानगरी वन्यजीव अभयारण्य,कोल्हापूर

How To Reach: