करवीर निवासिनी श्री अंबाबाईची नगर प्रदक्षिणा
यंदा भाविकांविना तरीही कडक बंदोबस्तात पार पडली प्रदक्षिणा मार्गावर रांगोळी सजलेली पण भाविकांविना मार्ग सुना सुना देवीच्या दर्शनाची आस घेऊन आलेल्या भाविकांनी अंबाबाईच्या उत्सव मूर्तीचे वाहन जाताना बॅरिकेट्स च्या बाहेरूनच अंबामाता की जय चा गजर करत हात जोडले अंबाबाईचे वाहन पारंपरिक वाद्याच्या गजरात महाद्वार चौकापर्यंत चालत आणण्यात आले येथे सजवलेल्या ट्रॅक्टर वरून प्रदक्षिणेसाठी निघाले भवानी मंडपात तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आरती करण्यात आली तेथून पुढे गुरु महाराज वाडा बिनखांबी गणेश मंदिर मार्गे वाहन पुन्हा मंदिरात आले मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उजळणी तसेच आरती केली