आज अश्विन शुद्ध तृतीया शारदीय नवरात्र महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस आजच्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ब्राह्मी या रूपामध्ये सजली आहे रक्तबीज असुराच्या वधावेळी प्रत्येक देवतेची शक्ती मूर्त रूप धारण करून आली त्या त्या शक्तीला त्या त्या देवतेचे नाव मिळाले शक्ती म्हणजे त्या देवाची पत्नी नव्हे तर शक्ती म्हणजे त्या देवाचे मूर्त सामर्थ्य. ब्राह्मी म्हणजे ब्रह्मदेवाची मूर्त शक्ती. ब्रह्मदेव म्हणजे माता महालक्ष्मी ची निर्मिती महालक्ष्मी स्वतःच्या रजोगुण आतून ब्रह्मदेवाला प्रगट केले या ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मितीचा सामर्थ्य दिले हेच सृष्टी निर्मितीचे सामर्थ्य मूर्त रूप आकार घेते ते रूप म्हणजे ब्राम्ही ब्रह्म देवाप्रमाणे चतुर्मुख म्हणजे चार मुखाची
चतुर्भुज म्हणजे चार हाताची अशी ब्रह्मदेवाच्या वाहनावर म्हणजे कमळावर विराजमान हंसवाहीनी हातात जपमाळ कमंडलू स्त्रुवा आणि स्त्रुक् (यज्ञाच्या पळ्या) असणारी अशी ही भगवती ब्राह्मणी मातृकां पैकी एक म्हणून ओळखली जाते. कोल्हापूर जिल्ह्यात खिद्रापूर वडकशिवाले चक्रेश्वर अशा अनेक ठिकाणी मातृका पट्टा आहेत या मातृका पट्ट्यांवर ब्राम्ही चे शिल्पांकन अगदी आवर्जून केलेली असते अशी ही ब्रह्ममय जगदंबा आपणा सर्वांवर अखंड कृपा करो हीच प्रार्थना
श्रीमातृ चरणारविंदस्य दास: प्रसन्न सशक्तीक:
Today on second day and on tritiya tithi of Ashwani Navaratri karveer nivasini Shree Mahalaxmi dressed up as goddess Brahmi. As per the saptshati occasion of raktbeej Vadh the power of every God took feminine form and came for battle goddess Brahmi is feminine form of Lord Brahma in Sanskrit this feminine form called as Shakti. Shakti is not a wife of particular God she is iconic picturization of the god it means Brahmi is the perfect picturisation of Lord Brahma’s how to create the universe hence it is tradition to consider Brahmi as feminine form of Lord Brahma means she also used to hold Mala kamandalu Struva and struk ( spoons of yadnya) in her four hands she is with four head also used to sit on Swan. I pray to Mahalaxmi that she bless you with the all the vidyas
Shrimatrucharanarvindasya dasa prasanna sashaktik