Project Description
दाजीपूरचे जंगल हे राधानगरी अभयारण्याचाच एक भाग आहे. पूर्वी हे शिकारीकरीता राखीव जंगल होते. कोल्हापूर संस्थानाचे महाराष्ट्र राज्यात विलीनीकरण झाल्यावर सन १९५८ ला दाजीपूर जंगलाची दाजीपूर गवा अभयारण्य आहे. राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या भोवतालच्या जंगल परिसराला मिळून सन १९८५ ला राधानगरी अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. येथील घनदट जंगलाचे पट्टे ड्म्ग याअ नावाने ओळ्खले जातात. येथील डोंगरमाथ्यांव्र जांभा खडकाचे मोठे सडे आहेत. सड्यांवर व सड्यांच्या भोवतली असणार्या दाट जंगलामध्ये एक संपन्न जैवविविधता आढळून येते.
प्रेक्षणीय स्थळे
लक्ष्मीसागर जलाशय, शाहूसागर जलाशय,सावराई सडा,सांबरकोंड,कोकण दर्शन पॉईंट,वाघाचे पाणी,सापळा,उगवाई मंदिर,शिवगड किल्ला.
१२१ प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद राधानगरी अभयारण्यात करण्यात आली आहे.सदर्न बर्डविंग हे भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू(१९० मी.मी) असून ग्रास ज्युवेल हे सर्वात लहान फुलपाखरू(१५ मी.मी) आहे.ही दोन्ही फुलपाखरे राधानगरी अभयारण्यात आढळतात.ह्जारोंच्या संख्येने एकत्र जमुन स्थलांतर करणारी ब्ल्यू टायगर,स्ट्राईप टायगर ही फुलपाखरे या ठिकाणी आक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आढळतात.
राधानगरी अभयारण्याचे महत्त्व म्हणजे निमसदाहरीत व पानगळीच्या मिश्र जंगल, विस्तीर्ण सडे व गवताळ कुरणात असंख्य प्रजातींचे वृक्ष, वेली, झुडपे, ऑर्किड्स, नेचे, बुरशी आढळतात.अभयारण्यात १५०० पेक्षा जास्त फुलझाडांच्या प्रजती येथील भागात आहेत. ३०० पेक्षा जास्त औषधी वनस्पतींचे हे भांडार आहे. करवंद, कारवी, निरगुडी, अडुळसा, तोरण, शिकेकाई, रानमिरी, मुरूड शेंग, वाघाटी, सर्पगंधा, धायटी इ. झुड्पे व वेली मोठ्या प्रमाणात आहेत.
- निसर्गात शिकण्यासारखे खूप आहे,त्याचा लाभ घ्या.
- जंगल हे प्राण्यांचे आश्रयस्थान आहे व आपण तेथील पाहूणे.तेथे मदयपाण,धुम्रपान,दंगा आदी गोष्टी करू नका.
- निर्सगाला स्वतःचे संगीत आहे,त्याचा आस्वाद घ्या.तेथे टेप,रेडिओ व इतर वादये वाजवू नका.
- जंगल परिसरातील पानवठयाच्या जागी जास्त वेळ घालवू नका.पाणवठा दूषित होईल अशी कोणतीही कृती करू नका.
- वन्यप्राण्यांशी जवळीक करण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो.पक्षांची घरटी ,प्राण्यांची वस्तीस्थाने इ.चा आदर करा.
- निर्सगात केर कचरा होइल अशा वस्तू घेउ नका.उदा.प्लॅस्टिक कॅरी बॅग, प्लॅस्टिकच्या-काचेच्या बाटल्या,चॉकलेट-वेफर्सचे रॅपर इ.
- वन्यप्राण्यांना कॅमेर्याने टिपा बंदूकीने नको.
Website : www.radhanagari.in
Photo Courtesy : Raman Kulkarni,Varad Giri, Harish Kulkarni,M.D.Madhusudan.
Information Courtesy : राधानगरी वन्यजीव अभयारण्य,कोल्हापूर